न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२४) :- पिंपरी चिचवड महानगर पालिकेच्या कागदपत्रामध्ये फेरफार व फसवणूक करून वृक्षतोड केली आहे. हा प्रकार (दि. ११) रोजी १२.०० च्या सुमारास आण्णासाहेब मगर बँकेमागे, कुदळवाडी, चिखली येथे घडला.
फिर्यादी भाऊसाहेब विष्णु सगरे यांनी आरोपी प्रल्हाद परशूराम पवार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी २७/२०२४ भा.दं.वि कलम ४२०, महा. झाडे तोडणे अधि.नि. ३ (१) ४ महा. (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण अधि.नि.२१(१) प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुळीक पुढील तपास करीत आहेत.














