न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२४) :- मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करत आघाडी घेतल्यानंतर ठाकरे गटाने आता प्रचाराला सुरुवात करण्याचे नियोजन केले. माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे हे रविवारी पिंपरीत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचे लोणावळ्यात जंगी स्वागत केले जाणार असून, तळेगाव दाभाडे आणि पिंपरीत ‘महान्याय, महानिष्ठा’ सभा होणार आहे. त्यात ते काय बोलणार याकडे सर्व शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे भक्ती शक्ती चौकात पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येईल, या नंतर युवा सेनेच्या हजारो कार्यकर्त्यांबरोबर आदित्य ठाकरे दुचाकी रॅली मध्ये सहभागी होणार आहेत.
या रॅलीचे स्वागत निगडी, आकुर्डी, चिंचवड स्टेशन आणि मोरवाडी चौक चौकात होईल. या नंतर दुपारी १२:३० वाजता मुख्य सभेचे ठिकाण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आदित्य ठाकरे मार्गदर्शन करतील.














