न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२४) :- वाल्हेकरवाडी येथे थेरगाव ग्रॅव्हीटी लाईन शुक्रवारी अचानक लिकेज झाली. त्यामुळे सेक्टर २३ हुन पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.
वाकड, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, सांगवी परिसरातील आज सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत व कमी प्रमाणात राहिल.
पाणी पुरवठा विभागामार्फत सदरचे काम तातडीने करण्यात येत आहे. त्यामुळे आज संध्याकाळी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. नागरिकांनी पाणी जपुन वापरावे व पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.


















