न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२४) :- यमुनानगरमधील द हॅपी फिट शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले. यावेळी कार्यक्रमात मुलांनी आपली कला सादर केली. कार्यक्रमात एकूण ५० मुलांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी जोशी यांनी उत्तमरित्या केले. मुलांच्या नृत्याचे संचलन विराट व अमृता वाईरकर यांनी केले. कार्यक्रम मुख्याध्यापिका पूजा शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
शाळेच्या शिक्षिका आभा जोशी, जान्हवी जोशी, पुनम डेरफळे, सपना पाटील, श्रीदेवी, अश्विनी, धनश्री व सारिका यांनी स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कलांगण कथ्थक क्लास, प्रज्ञा शिंदे यांच्या विद्यार्थिनींनीसुद्धा आपली कला सादर केली. हा कार्यक्रम ज्ञान प्रबोधिनी शाळेतील मनोहर वाढोकार सभागृहात पार पडला. पालकांनी मुलांचे कौतुक करत मुलांचे मनोधैर्य वाढविले.