न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून फेब्रुवारी महिन्यात पक्की अनुज्ञप्ती काढण्यासाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी माहिती दिली आहे.
पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे 5 व 6 फेब्रुवारी, मंचर येथे 12 व 13 फेब्रुवारी, जुन्नर येथे 21 व 22 फेब्रुवारी, वडगाव मावळ येथे 26 व 27 फेब्रुवारी तर लोणावळा येथे 28 व 29 फेब्रुवारी या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौरा होणार आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 नंतर स्लॉट बुकिंग करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.