न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२४) :- वाल्हेकरवाडी येथे जिल्हा क्रीडा संकुल व स्मिता वाल्हेकर स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पै. खाशाबा जाधव क्रीडा पुरस्कारांचे वितरण सोहळा व इंदिरा माई स्वस्त थाळी व चौपाटीचे उद्घाटन उद्या रविवारी (दि. ४) रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी महाराज चौक येथे संपन्न होणार आहे.
मा. आमदार व राज्यमंत्री रमेश बागवे व अभिजीत बिचकुले यांच्या शुभ हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव गावडे यांच्या हस्ते रघुनाथ सावंत, मनोज पिंगळे, दादासाहेब देवकाते, विनायक तुम्मा, राजेश इरले, अशोक गुंजाळ, प्रवीण बोरसे, मिलिंद पठारे, महेंद्र गोकुळे, इकबाल शेख, सुनील साठे, सुशील वाळुंजकर व संजय मराठे आदी मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शहरातील नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्लेकर यांनी केले आहे.

















