- भोसरीत पितापुत्रांना मारहाण; कोयता उगारून मच्छी मार्केटमध्ये तिघांची दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२४) :- ‘ये म्हता-या तु आम्ही सांगेन तेथुनच मासे घे नाही तर; तुझ्याकडे बघतोच, अशी धमकी तिघांनी फिर्यादीच्या वडिलांना दिली. त्यावर ‘त्यांना तुम्ही असे का? बोलता’ असे ते आरोपींना म्हणाले. त्यावरुन चिडून जावुन मारहाण करत असल्याने सदरची भांडणे सोडविण्याकरीता फिर्यादी तिथे गेले.
इसमांनी ” तु आम्हाला ओळखले नाही, तुला तर दाखवतोच ” असे म्हणत आरोपी क्र. २ हा म्हणाला की, “कुक्या याला जिवंत सोडू नको याची आज गेम वाजव”. आरोपी क्र. १ याने त्याच्या जवळ असलेला कोयता हा फिर्यादीला जिवे ठार मारण्याकरीता फिर्यादीच्या डोक्यामध्ये मारला. सदरचा वार चुकविण्या करीता फिर्यादीने उजवा हात डोक्याजवळ नेला असता तो कोयता हा फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पंज्यावर व मनगटावर मारुन फिर्यादीला जखमी केले. तसेच फिर्यादीवर कोयत्याने वार करणा-या आरोपी क्र. १ याने त्याच्या जवळील कोयता हा हातामध्ये धरुन तो व त्याचे दोन मित्र आरोपी क्र. २ व ३ यांनी ” कोणी जर भांडणे सोडविण्यास आला तर त्याला देखील जिवंत सोडणार नाही ” असे म्हणुन परिसरात दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ०१) रोजी रात्री ०७:३० च्या सुमारास मच्छी मार्केट, अंकुशराव लांडगे नाटय सभागृहाजवळ, भोसरी येथे घडला. फिर्यादी आब्बास इकबाल आत्तार (रिक्षा ड्रायव्हर) यांनी आरोपी १) आदर्श ऊर्फ कुक्या गोविंद जगताप, २) सुनिल राणोजी जावळे, ३) रोहित ऊर्फ कुक्या ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ६८/२०२४ भा.दं.विकलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ आर्म अॅक्ट ४ (२५) म.पो.काकलम ३७ (१) सह १३५ क्रि.लॉ.अ. अॅक्ट कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे. पोउपनि शेख पुढील तपास करत आहेत.














