- आयुक्त शेखर सिंह यांनी कार्यकाळातील विकासकामांचा ऑडीट रिपोर्ट शहरापुढे मांडावा..
- परिवर्तन विकास आघाडीच्या छाया सोळंके-जगदाळे यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२४) :- नागरी सुविधासाठी विकासकामांना गती देण्यासाठी कर्ज काडून विकासकामे करणे म्हणजे पाप नसल्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी एका पत्रकार परिषद उद्गार काडले आहे. मग कोणती पुण्यांची विकासकामे केली आहेत तेही शहराला कळुद्या असा प्रश्न पिपंरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या संस्थापक अध्यक्षा छाया सोळंके-जगदाळे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना केला आहे.
या बरोबरच आपण महापालिकेच्या आयुक्त पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर शहरात हजारो कोटीच्या विकासकामांना मंजूरी दिली आहे यामध्ये नागरीकांना कितपत फायदा झाला व त्या कामांच्या खर्चाचे ऑडीट देखील शहरापुढे ठेवा अशी मागणी करुन शहरात रस्त्याच्या शुशोभिकरणामुळे अनेक ठिकाणी रस्ते अरुंद झाले असून रोजच मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरीक जायबंदी होत आहेत. हे पाप कुणाचं ते पण आयुक्तांनी शहराला सांगवे असा प्रतिप्रश्न केला आहे.
विकासकामाच्या नावाखाली महानगरपालिकेला व पर्यायाने येथील सामान्य नागरीकांना कर्जाच्या खाईत लोटण्याचे पाप आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व सत्ताधारी आमदार, खासदरा यांनी करु नये. महापालिका प्रशासक काळातील सर्वच विकासकामासाठी मंजूर केलेले आदेश हे कुणाच्या फायद्यासाठी घेतले गेले, यातुन कुणाचे हित साध्य केले, हे पिंपरी चिंचवडमधील मतदारांना स्पष्ट पणे समजून आले आहे. स्मार्ट सिटी, अर्बन स्ट्रीट रस्त्याच्या नावाखाली शहरातील करदात्यांच्या कोट्यावधी रुपयाचा चुराडा करुन शहराला जीवघेणी वाहतूक कोंढी दिली. आज अनेक फुटपाथवर दुकानदारांनी, हॉटेलचालकांनी अतिक्रमण केले आहे. त्यांच्या ग्राहकांची वाहने आज रस्त्यावर उभी असल्याने रस्ते वाहतुकीसाठी अपुरे पडत आहेत. शहरातील लोकसंख्या व पर्यायाने रहदारी व दुचाकी, चारचाकी वाहने यांची संख्या वाढत असताना रस्ते रुंद करण्याएवजी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याएवजी महापालिकेनच रस्त्यावरच जेथे गरज नसताना देखील रस्त्यापेक्षा फुटपाथच मोठे केले आहेत. सुशोभिकरणाच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्ते अरुंद करुन नागरीक व वाहनचालकांना मरण यातना देण्याचे काम आयुक्त तुम्ही केले व तुमच्या या पापत टक्केवारीसाठी गप्प बसलेले येथील आमदार, खासदार माजी नगरसेवक सुध्दा तितकेच सहभागी आहेत हे जनात कदापी विसरणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात या शहरात सत्ताधारी व विरोधक सोडून परिवर्तन होणे आवश्यक आहे. यासाठी या शहरातील पत्रकार, डॉक्टर, विज्ञीतज्ञ, व्यापारी वर्ग, नागरी कृती समिती, सजग महिला, होसिंग सोसायटी फेडरेशन व महाविद्यालयीन तरुण वर्गाने सर्व जात, धर्म बाजूला ठेवून शहराच्या स्वच्छ व पारदर्शी विकासाठी व महापालिकेत अधिकारी वर्गाच्या चाललेल्या अंधाधुद व भ्रष्ट आणि मनमानी कारभाराला विरोध करण्यासाठी पुढे यावे असे देखील आवाहान छाया सोळंके-जगदाळे यांनी केले आहे.














