न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२४) :- वाकडमधील तब्बल दीड हजार कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्या प्रकरणी संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेकडून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गेल्या पंधरा दिवसांपासून महापालिकेसमोर “बेमुदत साखळी उपोषण” करण्यात येत आहे. परंतू महापालिकेत ये-जा करणाऱ्या आयुक्तांना मात्र सदरील आंदोलन दिसत नसल्याने त्यांना आंदोलन दिसावे,आणि त्यांनी या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी आयुक्तांना जाड भिंगाचा ‘चष्मा’ भेट देण्यासाठी गेलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवले.यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने’ ‘ठिय्या आंदोलन’ करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाची भेट घेत ‘या घोटाळ्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करून, योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष सतीश काळे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हाउपाध्यक्ष ज्ञानदेव लोभे जिल्हा सचिव वैभव जाधव जिल्हा उपाध्यक्ष शहर रावसाहेब गंगाधरे शहर सचिव महेश कांबळे,निलेश शेंडगे,वीर भगतसिंह विध्यार्थी परिषदचे नकुल भोईर,सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार,विशाल सरोदे संदीप नवसुपे जिजाऊ ब्रिगेडच्या कल्पना गिड्डे ताई,वसंत पाटील,संतोष शिंदेअभिषेक गायकवाड,किरण खोत,प्रफुल्ल वाघमारे,जनार्दन देठे आदी जणांनी सहभाग घेतला होता.


















