न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२४) :- फाल्कन ट्रेकर्स, चिंचवडच्या प्रयत्नातून निगडी ते सिंहगड पायथा थेट बससेवा सुरु झाली आहे. रविवारी विश्वजीत बारणे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून उत्साहात ही बस सिंहगड पायथ्याला रवाना झाली.
ही बस दर रविवारी पहाटे ५ वाजता भक्ती शक्ती बस स्थानक निगडी येथून निघेल आणि चिंचवड, भूमकर चौक मार्गे सिंहगड पायथ्याला साधारण ६.४५ ला पोचेल. तर, परतीसाठी तिकडून सकाळी १० वाजता निघून निगडीला सकाळी ११.४५ पर्यंत येईल.
फाल्कन ट्रेकर्स चिंचवडचे दिलीप व साहेबराव पुजारी यांच्या प्रयत्नातून सुरू झालेली ही महत्त्वपूर्ण सेवा अथकपणे सुरू ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली.