न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंत्याच्या दोन वेतनवाढ स्थगित करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली.
गणेश धोंडिबा राऊत असे वेतनवाढ स्थगित केलेल्या विद्युत विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. कामकाजाची मुळ निविदा नस्ती चार्ज हस्तांतरणा वेळी गहाळ झाल्याने आणि वरिष्ठांशी उद्धट वर्तन केल्याप्रकरणी राऊत यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली होती.
निविदा नस्ती हेतुपुरस्सर गहाळ केल्याने आणि नियमबाह्यपणे बिले अदा केल्याने कनिष्ठ अभियंता गणेश राऊत यांच्या दोन वेतनवाढी स्थगित करण्यात आल्या आहेत. या आदेशाची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात केली जाणार आहे.











