न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २३ एप्रिल २०१९) :- पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीची अध्यक्ष अभय भोर यांच्या अध्यक्षतेखाली भोसरी एमआयडीसीतील भोर रबर प्रॉडक्टस येथे सोमवार (दि. २२) रोजी बैठक संपन्न झाली.
या बैठकीस पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अभय भोर, विश्वनाथ टेमगिरे, काकासाहेब देशमुख, प्राध्यापिका माधुरी गुरव, आशा भोसले, स्नेहल शिरोडकर, सुनिता भोर, स्वाती बेंद्रे, उषा शिंदे, वनिता भांडेकर, पूनम भूमकर, राधा पुंनडे, चेतन साबळे, गणेश विपाट, किराण हिंगोले व शहरातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
भोसरी एमआयडीसी व औद्योगिक परिसरात मोठ्या संख्येने कारखाने आहेत. तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यात त्रेचाळीस हजार कारखाने आहेत. या सर्व भागात कामगारवर्ग मोठय़ा संख्येने कामासाठी येत असतात. विविध भागातील उदयोजकही कामानिमित्त या परिसरात येत असतात. या परिसरात उपहारगृह कमी आहेत. त्यामुळे त्यांची जेवणाची परवड होते. या बैठकीत त्यांच्यासाठी प्रत्येक ब्लॉकमध्ये पोळीभाजी केंद्र उघडण्यात येणार आहेत, असा निर्णय झाला.
या व्यवसायामुळे परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच शहरात अनेक ठिकाणी महिलांतर्फे क्लस्टर योजना सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे सामूहिक व्यवसाय सुरू करण्यास चालना मिळणार आहे.
एमआयडीसी आणि इतर परिसरात महिलांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी विकास आघाडीच्या वतीने विविध उद्योग व्यवसाय सुरू करण्यात येणार आहेत. महिलांना उद्भवणाऱ्या अनेक समस्या यावेळी समजून घेण्यात आल्या. बचत गटातर्फे विविध उत्पादने महिलावर्ग बनवितात. परंतु, प्रदर्शना व्यतिरिक्त त्यांना विक्री व्यवस्था उपलब्ध नसते. त्यासाठी व्यासपीठही उपलब्ध करून देण्याची संकल्पना यावेळी मांडण्यात आली, अशी माहिती अभय भोर यांनी दिली.











