न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२४) :- खेड तालुक्यातील च-होली खुर्द, सुरेशनगर येथे (दि. २२) रोजी पहाटे २.३० वा ते ३.०० वा चे दरम्यान कुटुंबासह फिर्यादी रमेश विठ्ठल थोरवे (वय ४३ वर्ष) हे त्यांच्या राहत्या घरी झोपले होते. त्यावेळी अचानक अनोळखी पाच जनांनी घराचा दरवाजा लाथ मारुन तोडला. त्या वाटे घरामध्ये जबरदस्तीने आत प्रवेश करुन त्या अनोळखी इसमांनी थोरवेसह त्यांची पत्नी, वडील यांना लोखंडी कोयता, लोखंडी विळा यांचा धाक दाखवून त्यांच्या पत्नीच्या अंगावरील सोन्याचे मंगळसुत्र व कानातील टॉप्स, थोरवे यांच्या पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम असा एकुण ९७,००० रुपयाचा माल जबरदस्तीने धाक दाखवून दरोडा टाकुन स्कॉर्पीओ वाहनामधुन आरोपी पळून गेले होते. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आळंदी पोलिसांनी आजुबाजुच्या परिसराची पाहणी करुन फिर्यादीने दिलेल्या स्कॉर्पीओ वाहन क्रमांकचा अत्यंत कशोसीने शोध घेत त्यांचा माग काढला. थेऊर फाटा येथे वाहन मिळून आले. त्यानंतर गाडीत असलेल्या चालकाला अत्यंत कशोसीने ताब्यात घेतले. इतर आरोपीबाबत तपास करत पोलिसांनी माग काढून त्यांना ताब्यात घेतले.
१) कोहीनूर विशाल पवार (वय २१ वर्ष, रा. चोराची आळंदी), २) धिरज उत्तम चव्हाण (वय ३५ वर्ष, रा. दापोडी, केडगाव, ता. दौंड, जि.पुणे), ३) नरेश धनजी सकीरा ऊ/र्फ हाकला (वय २५ वर्ष, रा. चोराची आळंदी, ता. हवेली, जि.पुणे, ४) पृथ्वीराज सुखदेव चव्हाण (वय २६ वर्ष, रा. दापोडी, केडगाव, दौंड, पुणे), अशी अटक आरोपींची नवे आहेत. आळंदी पोलिसांनी अत्यंत शिताफीने दरोड्याचा गुन्हा २४ तासाच्या आत उघडकीस आणला.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक लोहार, पोहवा ५०५ लोणकर, पोहवा १४८५ वहिल, पोहवा ६६८ राजु जाधव, पोलीस हवालदार १४८३ कु-हे, पोलीस नाईक १९२१ सानप, पोलीस शिपाई १३०६ खेडकर, पोलीस शिपाई २२६८ पालवे, पोलीस शिपाई १९३० आडे यांनी केलेली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सपोनि लोहार हे करीत आहेत.















