न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २३ एप्रिल २०१९) :- मावळ लोकसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाराम नारायण पाटील यांच्या प्रचारार्थ आज मंगळवार (दि. २३) रोजी सायंकाळी ६.०० वाजता बळीराज गार्डन मंगल कार्यालय, नखाते वस्ती, रहाटणी येथे ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर व बैरिस्टर असुद्दिन ओवेसी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम नारायण पाटील, वंचित बहुजन आघाडीचे समन्वय अरुण चाबुकस्वार, प्रवक्ते शाहिर सचिन माळी, अध्यक्ष पिं. चिं. भारिप देवेंद्र तायडे मा, अध्यक्ष एमआयएम पश्चिम महा. अकिल मुजावर, वंचित बहुजन आघाडीचे समन्वय महेंद्रसिंग आदियाल, अध्यक्ष आदिवासी भटक्या मु . जाती शिंदे महाराज, धम्मसंगिनी रमा गोरख, समन्वय वंचित बहुजन आघाडी स्वाती कदम, गोंधळी समाज प्रदेशाध्यक्ष मारूती कदम, अध्यक्ष आदि . भ . य . संघटनामाऊली सोनवणे, वंचित बहुजन आघाडी सदस्य सुरेश भालेराव,
वंचित बहुजन आघाडी सदस्य गुलाब पानपाटील व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक व वंचित बहुजन आघाडीचे समन्वय अरुण चाबुकस्वार यांनी केले आहे.











