न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२४) :- सोबत काम करणारा कामगार आरोपी दोन महीन्यापुर्वी कंपणीमध्ये झोपला होता. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याचे फोटो काढुन सुपरवायझरला पाठवले होते. त्याचा राग मनात धरुन आरोपी क्रं १ व त्याचे इतर २ साथीदार यांनी फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली.
तसेच फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडके मारले. फिर्यादी जीव वाचवण्यासाठी शेजारी असलेल्या दोन ते तीन रुम सोडुन उघडया रुममध्ये पळत गेले असता आरोपी क्रं १ याने त्याच्या हातातील चाकुने फिर्यादीला कंबरेजवळ डाव्या बाजुस तसेच पाठीवर कंबरेच्यावर चाकु मारुन जबर जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याबरोबर इतर दोन अनोळखी इसमांनी त्याच्या हातातील चाकु हवेत भिरकावुन फिर्यादीस घाबरवले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २३ रोजी सायं ६.०० वाजता एच पी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे जामदार वस्ती, निघोजे ता. खेड जि. पुणे येथे घडला. फिर्यादी बरकत अली मोहमद अली शहा (वय १८ वर्षे) यांनी आरोपी इंद्रजीत सगर व इतर दोन अनोळखी इसम (अंदाजे वय २० ते २२ वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी १०९/२०२४ भा.द.वि.क.३०७,३२४, ३२३,५०४, ५०६,३४ सह भारतीय हत्यार कायदाकलम ४(२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलासकुथे सहा. पोलीस निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.











