न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२४) :- तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही येत्या २ मार्च रोजी कै. कल्याणराव उर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेंतर्गत शिवचरित्राचे अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी दिली.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक राष्ट्रोत्सव’ या विषयावर शिवचरित्राचे अभ्यासक प्रा.नितीन बानगुडे पाटील बोलणार आहेत. या कार्यक्रमाचे उदघाट्न २ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता सेवाधाम ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या प्रांगणात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळचे आमदार सुनील शेळके असणार आहेत.