न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२४) :- पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगाराला पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
वैभव चोखोबा हातांगळे (वय-२४ रा. बनसाळ गल्ली, गांधीनगर, पिंपरी) असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीने पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयत्यासारखी जीवघेणे हत्यारांसह फिरताना गंभीर दुखापत करणे, दुखापत करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे 7 गंभीर गुन्हे केले आहेत.
वैभव हातांगळे याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी वैभव हातांगळे याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
ही करावाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देवडे, गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, ओंकार बंड यांच्या पथकाने केली.











