- शहर भाजपा कायदा आघाडीकडून ‘वकिलांचा स्नेह मेळावा व ‘विधिज्ञ नारीशक्ती’ पुरस्काराचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२४) :- भाजपा कायदा आघाडी पिंपरी चिंचवड जिल्हा यांच्या वतीने जागतिक महीला दिनाचे औचित्य साधुन ‘वकिलांचा स्नेह मेळावा व विधिज्ञ नारीशक्ती पुरस्कार २०२४’ सायन्स पार्क, चिंचवड येथे (दि. १२) रोजी पार पडला.
या कार्यक्रमात अॅड. संगीता परब, अॅड. शोभा कड, अॅड. दिपाली डुंबरे, अॅड. शोभा कदम, अॅड. तारा नायर या महिला वकीलांना ‘विधीज्ञ नारीशक्ती’ पुरस्काराने जिल्हा अध्यक्ष भाजपा शंकर जगताप, भाजपा कायदा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. धर्मेंद खांडरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
पंतप्रधान नरेंद मोदी यांचा पंतप्रधान पदाचा तिसरा कार्यकाळ देशातील महिला शक्तीच्या प्रगतीचा नवीन अध्याय लिहणार, असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त करून ‘फिर एक बार मोदी सरकार’ साठी आपण सर्वांनी काम करावे असे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी उज्वला गॅस योजना, शौचालय योजना, हर घर नल योजना इ. योजना राबविल्या असल्यामुळेत्याचा फायदा महिलांचा विकास होणेसाठी होत आहे. मोदीजींनी भारतीय राज्यघटनेतुन कलम ३७० काढून टाकले. प्रत्येक मुलाच्या नावामध्ये आईचे नाव समाविष्ट करून महिलांचा सन्मान वाढविला आहे. प्रत्येक प्रभागामध्ये विधी सेवा केंद्र चालु करून मोफत सल्ला देण्यासाठी प्रयत्न करावे, असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. धर्मेंद खांडरे यांनी मांडले.
कार्यक्रमाचे नियोजन अॅड. गोरखनाथ झोळ, अध्यक्ष कायदा आघाडी यांच्या नेतृवाखाली महिला आघाडी अध्यक्षा अॅड. पल्लवी विघ्ने, युवा अध्यक्ष अॅड. हर्षद नढे यांनी व नारीशक्ती पुरस्कार समिती वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. मंगेश लोहारे, सरचिटणीस अॅड. गोरख कुंभार, उपाध्यक्ष अॅड. अमोल माने, अॅड. अंकुश गोयल, चिटणीस अॅड. सोपान पाटील, अॅड. बालाजी पवार, अॅड. जया गोरे, अॅड. मनाली सावंत यांच्या कार्यकारिणीने पुरस्कर्त्यांची निवड केली.
पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे, दक्षिण भारतीय आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मेडिगीरी, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शैलजा मोळक, सुजाता पालांडे, आर एस कुमार, सुरेश भोईर, राजु दुर्गे, अॅड. श्रीकांत दळवी, अॅड. अतिश लांडगे, अॅड. रामराजे भोसले, अॅड. प्रमिला गाडे तसेच पिंपरी चिंचवड वकिल संघटनेचे पदाधिकारी व वकिल बंधु भगिनी, भाजपा कायदा आघाडीची सर्व कार्यकारिणी आणि कार्यक्रमास मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. भाजपा कायदा आघाडीचे अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ यांनी कायक्रमाची प्रस्तावना केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅड. दत्ता झुळुक, अॅड. अजितकुमार जाधव, अॅड. नितिन पवार, अॅड. जॉर्ज डिसोजा, अॅड. वैशाली मुळीकर, अॅड. प्रशांत भागवत, अॅड. विठ्ठल मोनार, अॅड. पुनम राऊत, महिला उपाध्यक्षा अॅड. अंतरा देशपांडे, अॅड. प्रियंका सुरवसे व महिला सरचिटणीस अॅड. प्रज्ञा कुलकर्णी, अॅड. संगिता कुशलकर व सर्व महिला पदाधिकारी यांनी प्रयत्न केले आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. सारिका कुलकर्णी व अॅड. मंगेश लोहारे यांनी तर, आभार अॅड. पल्लवी विघ्ने यांनी मानले, अशी माहिती अॅड. गोरखनाथ झोळ यांनी दिली.