- शिरूर लोकसभेसाठी नेतृत्वाच्या आढळरावांना कामाला लागण्याच्या सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२४) :- मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले.
राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोधही आता कमी होत आहे. त्यामुळे आता शिरूमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत.
दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हेदेखील उपस्थित होते. त्यात महायुतीचे उमेदवार म्हणून कामाला लागण्याच्या सूचना आढळराव पाटील यांना देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विरोध दर्शवला. खुद्द आढळराव पाटील यांनी खेडला निवासस्थानी जाऊन आमदार मोहिते पाटील यांची भेट घेतली. पण, विरोध कायम होता.