न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२४) :- लोकांनी चारचाकी वाहन बुकींगसाठी विश्वासाने ‘शो रूम’ मधील कर्मचाऱ्याकडे रक्कम सोपविली होती. ती रक्कम शो रूम च्या बँक खात्यावर जमा करणे आवश्यक होते, मात्र त्याने ते जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी एकूण ३,०४,८४० रुपयांचा वापर करून अपहार केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.०२/१०/२०२३ ते दि. ३१/०१/२०२४) दरम्याण टाटा गारवे कार्सचे शोरूम, बाणेर येथे घडला. फिर्यादी दत्तात्रय बबन जाधव यांनी आरोपी लक्ष्मण बापू पवार (रा. शिवणे, मुळ पत्ता तांबेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ३३७/२०२४ भा.दं.वि कलम ४०८ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


















