न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२४) :- दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी २६ वर्षांपुर्वी थोर क्रांतीकारक हुतात्मा भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरू यांच्या अतिउच्च बलिदानाने पावन झालेल्या २३ मार्च या दिवशी यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी ‘हुतात्मा दिन’ म्हणून ओळखला जावा याची सुरूवात केली.हा कृतज्ञता दिवस उभ्या महाराष्ट्रातच नव्हे तर पुढे तो देशभर संस्मरणात राहावा याचा तो प्रयास होता.
दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी स्थापन केलेल्या ‘गडकिल्ले सेवा संस्थे’च्या माध्यमातून गेली २६ वर्षे २३ मार्च या दिवशी या थोर क्रांतीकारकांना वंदन करून त्यांच्या कार्याचा आणि असिम त्यागाचा व्याख्यानात्मक कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करून साजरा करण्यात येतो.
आज ही’गडकिल्ले सेवा संस्थे’ने २३ मार्च-हुतात्मा दिनाचे औचित्य साधून चिंचवड येथे ‘मोरया गोसावी क्रिडासंकुलाशेजारी’ रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगरसेवक राजेंद्र गावडे व हुतात्मा क्रांतीकारक वैकुंठ शुक्ला यांचे वंशज पवन कुमार शुक्ला यांच्या हस्ते झाले या वेळी अनेक सामाजिक संस्था,दुर्गप्रेमी,दुर्गमहर्षींचे शिष्य तसेच आम जनतेने या रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदविला.
अविरत श्रमदान संस्थेचे श्री.जितेंद्र माळी,राम रोकडेवार,गिरिष गव्हाळे,रूपेश माने,उद्योजक श्री.संतोष कदम यांनी उपस्थित राहून रक्तदान केले.
सागरमाथा गिर्यारोहण संस्थेचे श्री.सुमित दाभाडे,प्रशांत नाईकरे,वैष्णव तापकीर,लखन घाडगे यांनी देखिल रक्तदाता म्हणून भूमिका बजावली.
ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या पालक संघातील अनेक पालकांनी रक्तदानात सहभाग नोंदवला.
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अनेक वृत्तपत्र विक्रेत्यांनी देखिल रक्तदान केले.आज सकाळी १०:०० ते दु.२:०० वाजेपर्यंत ४१ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी गडकिल्ले सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री.निलेश गावडे,कार्याध्यक्ष श्री.संतोष घुले,सहकार्याध्यक्ष श्रीहरी तापकीर,सचिव अॅड.अजय सोनवणे रविराज फुगे,प्रविण मळेकर,मनोज भालेघेरे,श्री.गरूड,श्री.भोईर यावेळी उपस्थित होते. या रक्तदान शिबिराची संपुर्ण जबाबदारी संस्थेचे श्री.मनोज काकडे यांनी सांभाळली तर पिंपरी चिंचवड शहरातील ‘वाय.सी.एम.हाॅस्पिटल रक्तपेढीचे कर्तव्य दक्ष कर्मचार्यांनी सहकार्य दिले.