न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०१९) :- शहरातील जनता सूज्ञ आहे. महायुतीच्या पाठिशी ठामपणे उभी राहील. कार्यकर्ता निर्भीड झाला आहे. मावळात महायुतीने प्रचाराची मुसंडी मारली आहे. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख यांच्या सभा झाल्या आहेत. दोन दिवस मी पूर्ण लक्ष घातले आहे. कोणत्याही परिस्थितीत मावळाची जागा राखण्यात आम्ही यशस्वी होवू, महायुतीचा उमेदवार नक्की विजयी होईल, असा विश्वास गिरीश बापट यांनी व्यक्त केला आहे.
पिंपरीमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव, शिवसेनेचे संपर्कनेते बाळाभाई कदम, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, भाजप प्रदेश नेत्या उमा खापरे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक बाबू नायर, अॅड. मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात बारामतीसह बाहेरचे लोक आणून विरोधकांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा जनतेवर प्रभाव पडणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. मतदारसंघात कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. पुणे जिल्ह्याचे अनेक वर्ष पवारांकडे नेतृत्व होते. सत्ता असताना त्यांनी विकास केला नाही.


















