न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२४) :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या संयुक्त जयंती महोत्सव निमित्त “रन फॉर भीमथोन” ही अर्ध मॅरेथॉन स्पर्धा रविवारी (दि. १४) रोजी सकाळी ६ ते ८ तसेच बाल आनंद मेळावा (दि. १३) रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळीत छत्रपती संभाजी महाराज उद्यान समोर, कोकणे चौक, रहाटणी या ठिकाणी आयोजित केला आहे.
ही अर्ध मॅरेथॉन स्पर्धा शांती, प्रेम, मैत्री आणि करूणाचा संदेश देण्यासाठी सर्व वयोगटातील समुदायासाठी तीन, पाच किलोमीटर अंतरावर असून प्रत्येकाला टी-शर्ट, चहा, पाणी, नाश्ता दिला जाईल.
बाल आनंद मेळावामुळे सर्व बाल गोपालांना धमाल, मजा, मस्ती, मनोरंजन करता येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संथापक अरुण चाबुकस्वार यांनी केले आहे. संस्थेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत सर (9921695242) व फहाद खान सर (9545247559) यांच्याशी सहभाग नोंदणीसाठी संपर्क साधावा.