न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२४) :- मंडळाच्या कार्यकर्त्यांसह फिर्यादी उभे होते. त्यावेळी शेजारील आळीतील आरोपी नं १ ते ६ यांनी फिर्यादीला बॅनर का फाडला? अशी विचारणा केली. फिर्यादीला हाताने, लाथाबुक्याने मारहाण करीत असताना त्यातील एकाने खाली पडलेला दगड फिर्यादी यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली.
तसेच फिर्यादीला वाचविण्याकरीता आलेला फिर्यादी यांचा मामा याना प्लास्टीकच्या बादलीने मारहाण करून दुखापत केली, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि.०९) रोजी रात्री ८.३० च्या सुमारास भोईआळी, तळेगाव दाभाडे येथे घडली.
फिर्यादी आकाश अशोक परदेशी यांनी आरोपी १) मयुर अनिल इंगळे, २) मिथुन पारखे, ३) गौरव जरग, ४) सौरभ जरग, ५) विशाल शेळके, ६) शगुन पारखे यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी २२३/२०२४ भादवि ३२४,३२३, १४१,१४३, १४७,१४९, प्रमाणे गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. सपोनि यमगर पुढील तपास करीत आहेत.