न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२४) :- आय.पी एल मॅचच्या मुळ तिकीटच्या दरापेक्षा जास्त दराने फिर्यादीला दोघांनी तिकीट विकण्याचा प्रयत्न केला. गैरप्रकारे तिकीटांचा काळाबाजार केला. तिकीटाचा साठा करीत तिकीटांची चढ्या किमतीत विक्री करण्याचा प्रयत्न करीत फिर्यादीची ९२,२०० रुपयांची आर्थिक फसवणुक करण्याचा दोघांनी प्रयत्न केला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हि घटना (दि. १०) रोजी दुपारी २.३० च्या सुमारास चापेकर चौक, के.जी.एन. हॉटेलजवळ, चिंचवड येथे घडली. फिर्यादी आकाश विजय साळवी यांनी आरोपी १) चेतन नामदेव पाटील, २) सचिन विनोद कुभांर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी १६९/२०२४ भा.दं. वि. कलम ४२०, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. पोउपनि व्हरकटे तपास करीत आहेत.