न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२४) :- सध्या उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. अंगाची लाही लाही होत आहे. अशा उष्ण वातावरणात शरीर थंड ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे लोक लिंबू सरबत आणि कलिंगडाला प्राधान्य देतात. सध्या बाजारात कलिंगडाचे ढीग पाहूनच तुम्हाला अंदाज येईल की कलिंगडाला उन्हाळ्यात किती जास्त मागणी असते. तुम्हीही बाजारातून कलिंगड विकत घ्यायला जातात तेव्हा काही काळजी घेणे आवश्यक आहे.
कलिंगड वरून हिरवे असते त्यामुळे ते आतून लालसर आणि गोड असेल का, असा आपल्याला प्रश्न पडणे साहजीकच आहे. कारण बऱ्याच वेळा कलिंगड घरी घेऊन गेल्यावर आतून खराब निघते किंवा कमी लालसर असते. पण कलिंगड विकत घेताना काही टिप्स फॉलो केल्या तर कलिंगड लाल, गोड आणि रसाळ आहे की नाही हे तुम्ही ओळखू शकता.
अशी घ्या काळजी..
कलिंगडामध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्त्वे आढळतात. जे शरीराला अनेक आजारापासून वाचवतात. कलिंगडामध्ये ९५ टक्के पाणी असते, ज्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता कधीच भासत नाही. परंतु हे फळ प्रत्येकवेळी गोड असेल असं नाही. अनेकदा कलिंगड खरेदी करताना तो गोड असेल की नाही हे आधीच समजून घेता येत नाही. त्यामुळे आपण कमी गोड किंवा लाल नसलेले कलिंगड घरी आणतो. अशा वेळी तुमचा भ्रमनिरास होतो.
कलिंगडावर काळा डाग किंवा एखादा डाग जरी दिसला तरी ते कलिंगड आतून गोड असेल की नाही याची खात्री नाही. कलिंगडाचा रंग पूर्णपणे हिरवा असतो किंवा त्यावर हिरवे आणि पिवळे असे दोन्ही पट्टे असतात. गडद हिरव्या रंगाचे कलिंगड गोड असण्याची शक्यता जास्त असते. पण याच्यापेक्षा फिकट रंगाचं कलिंगड तितके गोड आणि रसाळ नसते.
तुम्ही जर एक लहानसा कलिंगडचा तुकडा कापून मागितला, त्यावरून संपूर्ण फळ कसं आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. आतल्या बाजूने कलिंगड लालबुंद असेल तरच तो गोड असण्याची शक्यता आहे. कलिंगड आतून गोड आणि रसाळ असेल आणि त्याचा वास येतो. तसेच ते ताजे दिसते. परंतु कलिंगड खूप जुने असल्यास किंवा आतून खराब असल्यास त्याचा कडवट, आंबट वास येतो. अशा स्थितीत कलिंगड चांगला नाही, तो ओळखायला हवा.