न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वीप मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड सनदी लेखापाल संघटनेच्या सभासदांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची शपथ घेतली.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मतदान नोंदणी अधिकारी संदिप खोत, स्वीप सचिव रमेश भोसले, समन्वयक प्रफुल्ल पुराणिक, तानाजी सावंत यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष संतोष संचेती, सदस्य पंकज पाटणी, सचिन बंसल, सिमरन लिलवानी, संतोष रांका, अशोककुमार पगारिया, पंकज सुराणा, कुंतीलाल शिंगी, वैभव मोदी, भरतकुमार पटेल यांनी शपथ घेतली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्वीप सचिव रमेश भोसले यांनी सर्वाना शपथ दिली.











