न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०१९) :- मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेकाप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून प्रति मतदार ४०० रुपये या प्रमाणे पैशांची वाटप केली जात होती.
हा प्रकार नवी मुंबईतील कामोठ्यात समोर आले आहे. याप्रकरणी निवडणुक विभाग आणि पोलीस प्रशासन चौकशी करून पुढील कारवाई करत आहे. शेकाप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून २० हजार रुपये रोकड आणि मतदार यादी जप्त करण्यात आली आहे.











