न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०१९) :- पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात उद्या सोमवार (दि. २९) रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मांजरी, मोशी आणि पिंपरी-चिंचवड उपबाजार बंद राहणार आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणू नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, बाजार समिती मुख्य कार्यालय, मुख्य बाजार आवारातील फुले, फळे, भाजीपाला, गुळ-भुसार, पान, केळी आदी बाजारांसह पेट्रोलपंप विभाग, भुईकाटा विभाग नेहमीप्रमाणे सुरू राहतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


















