न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०१९) :- चौथी एशियन सिलम्बम अजिंक्यपद स्पर्धा २०१९ ही नागरकोईल, कन्याकुमारी, तामिळनाडू येथे शनिवार व रविवार (दि. २७ ते २८ एप्रिल) या कालावधीत पार पडली.
या स्पर्धेत १६ आशियायी देशातील ४३७ खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये अजिंक्यपद पारितोषिक अनुक्रमे प्रथम क्रमांक मलेशिया, द्वितीय क्रमांक भारत, तृतीय क्रमांक बांगलादेश, चतुर्थ क्रमांक इराण या देशांना गुणानुक्रम क्रमवारीप्रमाणे मिळाले. भारतीय संघात महाराष्ट्रातील २२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये ५ सुवर्ण पदक, १३ रौप्य पदक व ११ कास्यपदकाची कमाई महाराष्ट्रातील २२ खेळाडूंनी केली.
प्राविण्यप्राप्त खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे
१) प्रिया सैनी (१ सुवर्णपदक, १ रौप्यपदक, १ कास्यपदक) २) साक्षी सैनी (२ रौप्यपदक, १ कास्यपदक) ३) आर्या लांजेकर (३ कास्यपदक) ४) अंजली बर्वे (१ रौप्यपदक, १ कास्यपदक ) ५) पल्लवी नागरगोजे (१ रौप्यपदक, २ कस्यपदक) ६) ऋतिक रेडकर (१ रौप्यपदक, २ कास्यपदक) ७) प्रणीत सुर्वे (१ सुवर्णपदक, १ रौप्यपदक) ८) सुफीयाज खान (१ सुवर्णपदक) ९) श्लोक तुम्बाने (१ सुवर्णपदक) १०) राज जाधव (१ रौप्यपदक) ११) साईराज ताम्हाणे (१ कास्यपदक) १२) करोमानी गायकवाड (१ सुवर्णपदक ) १३) हर्शल ताम्हाणे (१ कास्यपदक) १४) चैतन्य काजुलकर (१ रौप्यपदक) १७) प्रणव साठे (१ कास्यपदक) १६) पुष्कर गव्हाळे (१ कास्यपदक) १७) सच्चिदानंद विथोटे (१ कास्यपदक) १८) अभिषेक संभ्मानावर (१ रौप्यपदक, १ कास्यपदक) १९) ओमकर हुपरे (१ कास्यपदक) २०) आश्रफ तांबोळी (१ रौप्यपदक, १ कास्यपदक) २१) हर्शल कापसे (१ रौप्यपदक, १ कास्यपदक) २२) रविराज चखले (१ रौप्यपदक)
या स्पर्धेत मार्गदर्शक पी. वाय. अत्तार ( वरिष्ठ उपाध्यक्ष ऑल इंडिया सिलम्बम फेडरेशन), एम. डी. गायकवाड ( सचिव ऑल महाराष्ट्र सिलम्बम असो.) संजय बनसोडे (महाराष्ट्र मार्गदर्शक), किरण अडागळे ( आशियाई पंच), गणेश मांडरे व स्मिता धिवर यांचे मार्गदर्शन लाभले.















