- मतमोजणी केंद्राच्या २०० मीटर परीसरात मनाई आदेश लागु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२४) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची मतमोजणी (दि. ०४) रोजी होत आहे. ३३ – मावळ या लोकसभा मतदार संघाची निवडणुक मतमोजणी श्री शिव छत्रपती क्रीडासंकुल, बालेवाडी पुणे या ठिकाणी होणार आहे. या निवडणुक प्रक्रियेतील महत्त्वाचा व शेवटचा टप्पा म्हणजे मतमोजणी असुन मतमोजणी प्रक्रियेनंतर किंवा दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये मतमोजणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
बालेवाडी मतमोजणी केंद्रावर आयुक्तालयातुन लावण्यात आलेला एकुण बंदोबस्त पोउआ ०२, सपोआ ५, पोनि १३, सपोनि/पोउनि ३४, अंमलदार २५०, आरसीपी २ एकुण ५३/२५० असा आहे तर, पोलीस आयुक्तालयामध्ये लावण्यात आलेला एकुण बंदोबस्त पोउआ ०६, सपोआ १०, पोनि/सपोनि/पोउनि १७०, अंमलदार १७५०, आरसीपी ०५, स्ट्रायकिंग ०४ असा आहे.
सीआरपीसी १९७३ चे कलम १४४ प्रमाणे (दि. ०४) रोजी ००.०१ वा. पासुन ते रात्री १२.०० वा. पर्यंत मतमोजणी केंद्राच्या २०० मीटर परीसरामध्ये तसेच आयुक्तालयामध्ये मनाई आदेश लागु करण्यात आलेले असुन त्याअन्वये मतमोजणी परिसरात कोणत्याही प्रकारचे हत्यार बाळगणे तसेच प्रदर्शित करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॉर्डलेस फोन, टॅब, लॅपटॉप, तसेच इलेक्ट्रॉनिक घड्याळ नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मतमोजणी परीसरामध्ये ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मतमोजनी परीसरात पासशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मतमोजणी निकाल जाहिर झाल्यानंतर (दि. ०४) रोजी मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आलेली आहे.