न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०१९) :- निवडणूक प्रचाराची महिनाभराची धावपळ संपल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी मुंबईला जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कोल्हे आता अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये जाणार आहेत. ‘स्वराज्य रक्षक संभाजी महाराज’ या मालिकेच्या चित्रीकरणाचे काम सुरू करणार असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
प्रचाराची धावपळ संपल्यानंतर शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोमवारी हडपसर येथे मुक्काम केला. मंगळवारी थोडेसे उशिराने म्हणजे आठ वाजता ते तयार झाले. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीमधील कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी एकूण मतदानाचा आढावा घेतला. सर्वाचे मनापासून आभार मानून कोल्हे दुपारी कुटुंबीयांच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.











