- योगाप्रेमींना इतर सुविधांचा देखील घेता येणार लाभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जून २०२४) :- महापालिकेच्या वतीने पिंपळे सौदागर येथे सुमारे ४ एकर ऐवढ्या क्षेत्रात अत्याधुनिक सर्व सोयीसुविधायुक्त योगा पार्क बांधण्यात आले आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत आतापर्यंत ३२४ कोटींची विविध विकास कामे करण्यात आले आहेत. यापैकी स्मार्ट सिटी अंतर्गत योगा पार्क विकसित करण्यात आले आहे.
हे योगा पार्क जुन महिन्याच्या अखेरिस नागरिकासाठी खुले करण्यात येणार आहे. सुरूवातीला या पार्क मध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, परंतु या पार्कची निगराणी राखण्याकरीता या पार्कमध्ये येण्यासाठी वेळ व प्रवेश शुल्क ठरवले जाईल. प्रत्येक व्यक्तीमागे ५ किंवा १० रूपये शुल्क आकारण्यात येईल. जेणेकरून या पार्कचे महत्व व काळजी राखली जाईल.
या पार्कमध्ये क्लाइबिंग, गेम्स, स्केटिंग, स्पेशल योगासभागृह, मैदान असेल तसेच लहान मुलासाठी स्वतंत्र खेळणी असतील. तसेच प्रशस्त वॅाकीग ट्रॅक असेल. हे योगा पार्क पिंपळे सौदागरच्या विकासत भर असणार आहे. तसेच या योगा पार्कमुळे नागरिकाना स्वतंत्र पार्कचा अनुभव घेता येईल.
या पार्कचे काम लवकर पुर्ण करावे ते लवकर खुले व्हावे, यासाठी मी वेळोवेळी मनपा विभागाकडे पाठपुरावा केला आहे. त्याला यश आले असून हे पार्क लवकरच जून महिनाअखेरीस खुले होत आहे. – माजी विरोधी पक्षनेते नाना काटे…