- घुसखोरीच्या मार्गाने केला होता भारतात प्रवेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जून २०२४) :- बांगलादेशी चौघा नागरिकांनी वैध प्रवासी कागदपत्र, व्हिसा तसेच भारत-बांगलादेश सिमेवरील मुलकी अधिका-यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला. भारतामध्ये बनावट आधारकार्ड, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला बनवून घेतला. त्याच्या आधारे ते भारतीय नागरिक असल्याचे भासवले. मोबाईल कंपनीचे सीमकार्डही प्राप्त केले.
हा प्रकार (दि. ०८) रोजी सकाळी ६.०० च्या दरम्यान मोशी येथे उघडकीस आला. दहशतवाद विरोधी कक्ष (एटीसी), एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी आरोपी १) पुजा धन्नो सरकार ऊर्फ रुबाया बिलाल मासुम नुर इस्लाम शेख (वय २४ वर्षे ग्राम दियापारा, उपजिल्हा- अभयनगर, जि. जेसोर, राज्य खुलना, बांगलादेश), २) धन्नो अरूण सरकार (वय २६ वर्षे रा. बेतग्राम, जि.गोपालगंज, राज्य खुलना, बांगलादेश), ३) मन्नो अरूण सरकार (वय २४ वर्षे, रा. वेतग्राम, जि. गोपालगंज, राज्य-खुलना, बांगलादेश), ४) लाबोनि सुशिल अय्यर ऊर्फ साथी खातून मंडल (वय २८ वर्षे, रा.ग्राम-अरपारा, पोस्ट-नलडांगा, जि. ओनैदाह, खुलना, देश-बांगलादेश) ५) सदर आरोपींना बनावट कागदपत्रे बनवून देणारे इतर पाहीजे आरोपी यांच्या विरोधात २८७/२०२४ भा.दं. वि. कलम ४२०,४६५,४६८,४७१,३४ सह परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४(A) (ड), १४ (C), पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ (१) (सी) व पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९५० चे कलम ३ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तसेच चौघांना अटक केली आहे. सपोनि पठारे पुढील तपास करीत आहेत.













1 Comments
merankhanam
Jerry Shop VC offers advanced features that attract users who value stability and convenience. With modern tools, easy navigation, and secure access, Jerry Shop VC continues to grow in popularity. Its reliable structure ensures users can trust the platform for consistent and hassle free services.