न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जून २०२४) :- वृध्दाश्रमासाठी जागेच्या शोधात असलेल्या समाजसेविका महिलेला जागा असल्याचे सांगत जागेसाठी त्यांच्याकडून टोकन अमाऊंट घेतली. वेळोवेळी त्यांच्याकडुन ऑनलाईन व रोख स्वरुपात एकुन १५,००,००० रुपये रक्कम स्विकारली. परंतु, जागेचा व्यवहार पुर्ण न करता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे.
तसेच फिर्यादीने दिलेले पैसे परत मागितले असता त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे, असं फिर्यादीत म्हंटल आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ पासुन ते (दि. ०८/०६/२०२४) श्री स्वामी समर्थ नावाचे वृध्दाश्रम, देहु-आळंदी रोडवर, जाधववाडी येथे घडला.
पुण्यातील वानवडीत राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेने विक्रांत बहल ( रा. दिल्ली, मुळगांव इटावा, राज्य-उत्तर प्रदेश) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. चिखली पोलिसांनी ३३२/२०२४. भादंवि कलम ४२०,४०६, ५०६ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुळीक पुढील तपास करीत आहेत.