स्वामीत्व असलेल्या व्यक्तीकडून हॉटेल चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जून २०२४) :- स्वामीत्व असलेल्या “SSV श्री. सिध्दीविनायक वडापाव’ याची स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता हुबेहुब नक्कल करून पिंपरीतील पिपरी कॉलनी परिसरात श्री सिध्दीविनायक वडापाव नावाचे हॉटेल सुरु केले.
हा प्रकार (दि ०८) रोजी दुपारी ४.५९ ते ५.४५ वा दरम्यान उघडकीस आला. फिर्यादी अमर सोमेश्वर लाड (वय ३८ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. बनकर वस्ती, मोशी) यांनी आ रोपी अझीमुद्दीन उर्फ सलीम निझामुद्दीन अन्सारी (वय. ३८ वर्षे रा. मोशी प्राधिकरण, मोशी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी ५५२/२०२४ कॉपीराईट अॅक्ट सन १९५६ चे कलम ५१, ६३, ६४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. वपोनि कडलग पुढील तपास करीत आहेत.