न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०१९) :- टी यु सी सी महाराष्ट्र राज्याच्या वतीने १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन एमआयडीसी भोसरी येथील कामगार नेते दादा रुपमय चटर्जी चौक येथे साजरा करण्यात आला.
टी यु सी सी महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी संभाजी शिंदे यांनी दादा रुपमय चटर्जी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी संभाजी शिंदे, विलास टकले, आर डी कांबळे, प्रमोद मोरे, अजय गडकरी, माणिकराव सस्ते व बबन भोर यांनी मनोगत व्यक्त केले.
कामगारांनी एकत्र येऊन कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन करण्यात आले तसेच कामगार दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. ज्या कामगारांनी लढा देऊन बलिदान दिले त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे ”महाराष्ट्र दिन चिरायू होवो” अशा घोषणा देऊन, महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास संजय सुर्वे, अमोल साळवे, आत्माराम खेतले, के के लातूरवाला, नीलेश शिनलकर, दीपक गौड, बाळासाहेब तांबे,नायड, बाळू ठाकूर तसेच एम आय डी सी वर्कर्स युनियन, महिंद्रा सिंटर्ड कामगार संघटना, पूना वर्कर्स युनियन, ऑर्डनन्स फॅक्टरी एम्प्लॉईज युनियन देहूरोड, अँम्युनिशन फॅक्टरी वर्कर्स युनियन खडकी या कामगार संघटनांचे सभासद बहू संख्येने उपस्थित होते.











