न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ मे. २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवृत्त मुख्याध्यापक व भोसरी गावचे रहिवासी सहदेव राणोजी ऊर्फ एस. आर. शिंदे सर (वय ७२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने आज बुधवारी (१ मे) सायंकाळी निधन झाले.
एस. आर. शिंदे यांनी अनेक वर्षे पिंपरी चिंचवड महानगरपालिका गणेशोत्सव स्पर्धा समितीवर परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा, जावई, सून, नातू असा परिवार आहे. शिंदे सर यांचे मुळगाव उदापुर, तालुका जुन्नर आहे, भोसरीतील संत सावतामाळी मंदिर उभारणीत तसेच शेकडो विवाह जुळविण्यात मोठे योगदान आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचे पुणे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहिले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांचे ते दाजी होत. एस. आर. शिंदे यांचा अंत्यविधी आज गुरुवार (दि. २ मे) रोजी सकाळी ९ वाजता भोसरी तळ्याकाठी संपन्न झाला आहे.











