न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस शिपाई भरती 2022-2023 प्रक्रिया (दि. 19) पासून सुरू करण्यात आलेली आहे.
या भरतीकरिता बाहेरून येणाऱ्या उमेदवारांची बालनगरी, अनुकूल चौक, गवळी माथा, पंपिंग स्टेशन, भोसरी-निगडी रोड, भोसरी येथील हॉल क्रमांक पाच, सहा व सात येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पहाटे चार वाजेपासून मैदानी चाचणी सुरू करण्यात आलेली असून 500 उमेदवार बोलविण्यात आलेले होते. त्यापैकी 281 उमेदवार हजर होते आणि 225 उमेदवार मैदानी चाचणी पूर्ण केलेली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्त तथा भरती अध्यक्ष यांनी दिली.











