न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२४) :- बजाज फायनान्स कंपनीच्या अज्ञात इसमाने फिर्यादी यांना फोन करुन अश्लिल शिवीगाळ केली. फिर्यादी यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी अश्लिल कृती केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १८) रोजी दुपारी १२.५० वा चे सुमारास फिर्यादीच्या घरी घडला. दापोडीतील ३७ वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी मोबाईल नंबर १) ८४२५०२०५०१, २) ८८२८९३२३६४ वरुन फोन करणारा बजाज फायनान्स कंपनीचा अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ३९२ /२०२४ भा.द.वि. कलम ५०७,५०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि पाटील पुढील तपास करीत आहेत.












