- संघटनेचे प्रादेशिक सल्लागार संतोष सौंदणकरांकडून त्यांचे स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२४) :- महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेत ‘इलेक्ट्रीसिटी लाईनस्टाप असोसिएशन’चे पुणे झोन सचिव गणेश जाधव यांनी शुक्रवारी (दि. २२) रोजी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन भानुशाली यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनना पुणेचे प्रादेशिक सल्लागार संतोष सौंदणकर यांच्या संपर्क कार्यालयात पार पडला.
यावेळी संघटनेचे केंद्रीय सहसचिव राजेश गाढवे, पुणे परिमंडळ अध्यक्ष मनोहर शिंदे, भोसरी विभागीय सहसचिव कुमार जाबगौड आदी उपस्थित होते.
पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची जनमाणसात तयार झालेली प्रतिमा तसेच त्यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन संघटनेचे तसेच पक्षाचे काम करण्यासाठी तत्पर राहील, असे आश्वासन सचिव गणेश जाधव यांनी दिले.