न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२४) :- वडापावच्या गाडीवर येऊन योगेश डोईफोडे याने ‘तुला हॉटेल चालवायचे असेल तर मला हप्ता द्यावा लागेल? तु शेजारच्या हॉटेल चालकाला विचार तुला कशाचा हप्ता ते समजेल. असं म्हणत हॉटेल चालकाच्या कानाखाली मारली.
‘तुला समजले का मी कोण आहे, मी या भागातील भाई आहे, मी दोन मर्डर करुन जेल मधुन बाहेर आलो आहे, तुला हप्ता दयावा लागेल, नाहीतर तुला जीवे मारुन टाकीन’ अशी धमकी दिली. हॉटेलमध्ये गी-हाईक त्याना घाबरुन निघुन गेले.ने बळजबरीने फिर्यादीच्या हॉटेलच्या गल्ल्यातील ११०० रुपये काढुन घेतले. ‘तुला दर महिण्याला मला ११०० रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर तुला हॉटेल चालु करु देणार नाही. तुझं हॉटेल रॉकेल ओतुन जाळून टाकीन, असे म्हणत हॉटेलबाहेरील टु व्हीलर गाड्यांना दोघांनी लाथा मारुन मोठमोठ्या आवाजामध्ये आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत दहशत निर्माण केली. शेजारच्या दुकानदारांनी घाबरुन त्यांची दुकाने बंद केली, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १४) दुपारी १२.३० वा. दरम्यान हॉटेल टॉवरलाईन चौक, तळवडे येथील हॉटेलमध्ये घडला. सौरब हरीहर लाड( वय-२५ वर्षे, धंदा व्यवसाय) यांनी आरोपी योगेश डोईफोडे व त्याचा एक साथिदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी ४०१/२०२४ भारतीय न्याय सहींता कलम ३०९ (६), ३०८(४), ११५ (२), ३५२, ३ (५), क्रिमिनल लॉ अमेंटमेंट अॅक्ट ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि पंचमुख तपास करीत आहेत.












