न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२४) :- हातातील लोखंडी कोयत्याने रत्यावरील उभ्या असलेल्या कार व इतर वाहनांची तोडफोड करून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. फिर्यादीची गचांडी पकडून ‘मी इथला भाई आहे. जास्त नाटक केलास तर तुला सोडणार नाही’ अशी धमकी दिली. तिघांनी त्यांच्या खिशातील रक्कम रू. ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतली. कोयत्याने पांढऱ्या रंगाची वॅगनर गाडीच्या काचा फोडुन नुकसान केले. इतर गाड्यांच्याही काचा फोडल्या. जाताना हातातील लोखंडी कोयता हवेत फिरवून दहशत निर्मान केली. आम्ही इथले भाई आहोत. असे म्हणत स्पेलंडर दुचाकीवरून रहाटणीच्या दिशेन निघून गेले, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १४) रोजी रात्री अंदाजे १.३० च्या सुमारास कौतीक हॉटेलच्या समोरील रस्त्यावर रहाटणी येथे घडला होता. बाळु लक्ष्मण केदारी यांनी आरोपी १) विकास रंगनाथ खरात (वय अंदाजे २० वर्षे, रा. भालेराव कॉलनी, रामनगर, रहाटणी), २) दिशान ऊर्फ बंटी दिपक साळवे (वय अंदाजे १९ वर्षे, रा. भालेराव कॉलनी, रामनगर, रहाटणी), ३) रितेश (वय अंदाजे २१ वर्षे, पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ८०४/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५),११५(२), ३२४ (४),३५१ (२) (३) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) सह क्रिमीनल अॅबेडमेंट अॅक्ट कलम ३ सह कलम ७ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम नुसार तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि जाधव तपास करीत आहेत.












