न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२४) :- छोटे-मोठे व्यावसायीक, कंपनी तसेच जनतेकडून कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करुन, त्यांच्याकडून हप्ता वसुली, खंडणी गोळा करणाऱ्या इसमाबाबतची माहिती निर्भिडपणे देण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खंडणी विरोधी पथकामार्फत नागरीकांना निर्भीडपणे तक्रार द्यावी याबाबत जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने स्क्रॅप व्यावसायीकाने खंडणी विरोधी पथक कार्यालयात समक्ष हजर राहुन तक्रार दिली. स्क्रॅप व्यवसायीकाचे अपहरण करुन खंडणी वसुल करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करुन, ०२ आरोपींतांना ८,२७,००० रुपयाच्या मुद्देमालासह खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेने अटक केली आहे.
मोशी येथील वॉशिंग सेंटरवरुन बाळा बांगर, प्रविण भालेराव व अशोक नावाच्या व्यक्तीने एका काळया रंगाचच्या कारमध्ये बळजबरीने स्क्रॅप व्यावसायीकाला बसवून, डांबुन ठेवुन, पुण्यात स्क्रॅप व्यवसाय करावयाचा असल्यास महिन्याला साडेतीन लाख रुपये द्यावे लागतील, अशी कोयत्याचा धाक दाखवून धमकी दिली. दिड लाख रुपये घेवुन सोडुन दिले होते. त्यानंतर पुन्हा दिड लाख रुपये घेतले. आणखीन पन्नास हजार रुपयांची खंडणी मागत आहेत, अशी तक्रार दिली होती. . त्याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं ३६४/२०२४ भा.न्या. सं कलम १४० (२), १४२, ३०८ (३),३०८ (४),३०८ (५),११५ (२), ३५२,३५१ (२) महा.पो.अधि. कलम ३७ (१) (अ),१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
मोशी प्रदर्शन केंद्राच्या मागील बाजुस, आरटीओ लिंकरोड, बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सापळा लावुन कारवाई करून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. १) बाळासाहेब बळीराम बांगर वय २७ वर्ष रा. शिक्षक कॉलनी, मेदनकरवाडी, चाकण, २) प्रवीण दत्तात्रय भालेराव वय २९ वर्ष रा. जयभवानीनगर, कोथरुड, यांना १ लाख ६५ हजार रुपये रोख रक्कम, ०३ मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली कार असे एकुण ८ लाख २७ हजार रुपयाचे मुद्देमालासह ताब्यात घेतले.
पुढील कार्यवाहीकामी एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी बाळासाहेब बळीराम बांगर व प्रवीण दत्तात्रय भालेराव हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द खंडणीसाठी अपहरण, खून, जबरी चोरी, बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणे, गंभीर दुखापत करणे व चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असुन बाळासाहेब बांगर यास तडीपार करण्यात आलेले आहे.
कोणीही व्यक्ती धमकी, दमदाटी व इतर कोणत्याही कारणाने हप्ता व खंडणीची मागणी करत असल्यास निर्भिडपणे खंडणी विरोधी पथकास मोबाईल नंबर 7517751793 / indgrevcell-pcpc@mah.gov.in/piaec.pcpc-mh@mahapolice.gov.in यावर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.












