न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२४) :- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या पदाचा आज मंगळवारी (दि. १६) रोजी राजीनामा दिला आहे.
त्यांच्यासोबत पक्षाचे माजी नगरसेवक आणि कार्याध्यक्ष राहुल भोसले, मा. नगरसेवक तथा भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनी तर, दिवंगत माजी विरोधी पक्षनेते दत्त साने यांचे चिरंजीव शहर राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष यश साने यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वांनी अपरिहार्य आणि वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे पत्रात म्हटले आहे.
सर्वानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. तो स्वीकारण्यात आला कि नाही याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. सर्वांची पुढील दिशा काय असेल? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. सविस्तर वृत्त लवकरच…














