न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२४) :- शासनाने ठरवुन दिलेल्या कोणत्याही नियम व अटींची पुर्तता न करता शाळा सुरु ठेवल. विद्यार्थ्यांना अनधिकृत प्रवेश दिला. विद्यार्थी व पालक यांच्याकडुन फि वसुल केली. शाळा अनधिकृत असताना अधिकृत शाळा असल्याचे भासवले. विद्यार्थ्यांचे दाखले, इतर शैक्षणीक कागदपत्रे ताब्यात घेवुन शासन, विद्यार्थी तसेच पालक यांची दोन अनधिकृत शाळांनी फसवणुक केली आहे.
पहिली घटना एप्रिल २०२४ पासुन ते आजपर्यंत लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कुल, चिंचवडेनगर येथे घडली. श्रेयशकुमार (रा. चिंचवडेनगर) याच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात २९०/२०२४ भा.न्या.सं. कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि गोडसे पुढील तपास करीत आहेत.
दुसरी घटना एप्रिल २०२४ पासुन ते आज पावेतो ऑर्चिड इंन्टरनॅशनल स्कुल, लिंक रोड, चिंचवड येथे घडली. १) जे डीकोस्टा रा. बेंगलोर २) समीर गोरडे रा. विमाननगर यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात २९१/२०२४ भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३३६ (२), ३३६(३),३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि व्हरकाटे पुढील तपास करीत आहेत.


















