न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२४) :- ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने गिहाईकांसोबत दुकानदार हे सोन्याच्या दागीन्यांची विक्री करीत होते. ते कामात असताना त्याचा फायदा घेवुन अनेकदा, वेळोवेळी, २,४०,००० रु किं चे ८०.८७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागीने चोरी करुन नेले.
हा प्रकार (दि. १२) रोजी भोसरी आळंदी रोड येथे असलेल्या वर्धमान ज्वेलर्स नावचे दुकानात उघडकीस आला. फिर्यादी रोशन अमृतलाल जैन यांनी आरोपी योगेश रामेश्वर जाधव (अंदाजे २९ वर्ष, रा. महादेव नगर, मजुरीबाई शाळा, दिघी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ४४१/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोफौ बोयणे पुढील तपास करीत आहेत.


















