- पिंपळे गुरवची आयडीयल इंग्लीश मिडीयम स्कुल ही शाळा बेकायदेशीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२४) :- शासनाने ठरवुन दिलेल्या कोणत्याही नियम व अटीची पुर्तता न करता शाळा सुरू ठेवली. विद्यार्थ्यांना अनधिकृत प्रवेश देवुन फि वसुल केली. शाळा अनधिकृत असताना अधिकृत असल्याचे भासवले. विदयार्थी यांचे दाखले इतर शौक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेवुन शासन, विदयार्थी तसेच पालक यांची फसवणुक केली.
हा प्रकार (दि ३०/०४/२०२४ रोजी पासुन ते दि. १७/०७/२०२४ पर्यत) आयडीयल इंग्लीश मिडीयम स्कुल, जवळकरनगर, पिंपळे गुरव येथे घडला.
शाळेचे संचालक चंद्रकांत खोडदे याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात २९७/२०२४, भा.न्या. सहिता कलम ३१८(४) ३३६(२) ३३६(३) कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि खलाटे पुढील तपास करीत आहेत.


















