- फसवणूकधारकाची पोलिसात धाव; चौघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२४) :- चौघांनी कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून एकाच फ्लॅटवर बेकायदेशीरपणे तिन बँकांचे गृहकर्ज मंजूर केले. फिर्यादी यांच्या नावे बँकेने मंजूर केलेल्या गृहकर्जाचा ४१,०८,००० रुपयांचा डी.डी. आरोपी १ ते ३ यांनी बिल्डर म्हणून दुसऱ्याच महिलेला उभी करून तीचे बनावट कागदपत्र तयार केले. तयार केलेली बनावट कागदपत्रे खरी आहेत, असे भासवुन चौघांच्या नावे बँक खाते काढून त्यामध्ये ४१,०८,००० रुपयांचा डीडी भरून खात्यातून परस्पर पैसे काढून घेत फिर्यादीची फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार जुन २०२३ ते दिनांक १८/११/२०२३ दरम्यान, फिर्यादीच्या राहते घरी व इंडियन बँक शाखा, भोसरी व दुय्यम निबंधक कार्यालय न-हे आंबेगाव या ठिकाणी घडला. फिर्यादी प्रविण रामदास मानकर यांनी आरोपी १) योगश ऊर्फ पांडुरंग दादाराव कदम, वय ३० वर्षे, धंदा फायनान्समध्ये नोकरी, रा. ट्रॉपिका, हौसिंग सोसायटी, समीर लॉनजवळ, रावेत, २) श्रीनिवास नामदेव काटंबे, वय ३१ वर्षे, धंदा किराणा दुकान, रा.श्री स्वामी समर्थ निवास, विजयनगर, मोरे कॉलनी, काळेवाडी, ३) लक्ष्मण पवार (पूर्ण नाव माहीती नाही) रा. विजयनगर, मोरे कॉलनी, काळेवाडी, ४) रूपाली तरस धारण केलेली अनोळखी महिला यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
चिखली पोलिसांनी चौघांच्या विरोधात ४१३/२०२४ भादवी कलम ४२०, ४६७, ४६८, ४७०, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि काकडे पुढील तपास करीत आहेत.

















