न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२४) :- पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे सभासद व सल्लागार अमित गोरखे यांची विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ, पिंपरी- चिंचवडच्या वतीने त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
वृत्तपत्र विक्रेता परिवारातील एक सदस्य कष्ट, जिद्द व सचोटीच्या जीवावर एवढा मोठा होऊ शकतो हे त्याचे जिवंत उदाहरण आहे, असे मनोगत
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता पिसे, सचिव अरुण निवंगुणे, तसेच विश्वस्त, पदाधिकारी, विभाग प्रमुख व विक्रेते बंधू आणि भगिनी उपस्थित होते,
आमदार अमित गोरखे यांनी पेपर विक्री व्यवसायात असताना पुढील आयुष्यासाठी टाईम मॅनेजमेंट कसे करावे? याचा अनुभव या व्यवसायाने दिला. तसेच त्यांच्या प्रामाणिक कष्टाचे चीज झाले असे सांगत भविष्यात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीच्या योजनांविषयी चर्चा करण्यात आली. सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.














